loader image
[ays_poll id=7]

शहरात डेंग्यू मलेरियाचा शिरकाव ; औषध फवारणी ची मागणी

Nov 23, 2022


शहरात डासांचा प्रार्दूभाव वाढल्यामुळे धूर फवारणी व औषध फवारणी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन नगर पालिकेचे प्रशासक सचिन कुमार पटेल यांच्याकडे राजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.

गेल्या महिन्याभरापासून मनमाड शहरात नियमित पणे घंटा गाडी येत नसल्याने व शहरातून वाहणाऱ्या नदी च्या दोन्ही बाजूला कचरा साचल्याने सर्व शहरात डासांचा प्रार्दूभाव वाढल्याची तक्रार नागरिकांनी आमच्याकडे केली आहेत. तसेच डासामुळे शहरातील नागरिकांना डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झाली आहे. तसेच काही नागरिकांना मलेरिया ची लागण झाली असल्याचे समोर आले आहेत. नगरपालिका आरोग्य कर्मचारी यांना वारंवार सांगून त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तीन महिन्यामध्ये नदीला दोनदा खूप मोठया प्रमाणात पूर आला होता. या पुरामुळे साचलेल्या पाण्यात डासांची अंडी साचून धोकादायक डेंग्यू चा प्रसार होत असून मागच्या काही दिवसात डेंग्यू चा शहरांत तब्बल 60 ते 70 रुग्ण आढळून आले आहेत. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण
स्वतः पुढाकार घेऊन हे धूर फवारणी व औषध फवारणी चे काम करून घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.

निवेदनावर राजे युवा प्रतिष्ठाण तसेच छोटू राऊत,अमोल परदेशी,आशिष पराशर,मोसीन भाई,बाळा भाऊ महाले,भाऊसाहेब वाळुंज,मोनू गांजे,निखिल पवार, महेश गवळी, गणेश भाऊ सांगळे, सोमनाथ जाधव, दीपक जगताप, मच्छिन्द्र जाधव,ललित बुरड,मंगेश परदेशी,गौरव जगताप,तुषार टेलर,मुदसर शेख,दत्तू मामा शिंदे,अरविंद जाधव,राजू भाऊ मोरे,आप्पा गवळी ह्यांच्या सह्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
.