loader image
[ays_poll id=7]

नायलॉन मांजावर बंदीची आर पी आय ची मागणी

Nov 23, 2022


नायलॉन मांजावर बंदी असताना शहरात मोठ्या प्रमाणात मांजाची अवैध विक्री केली जाते. या मांजामुळे पशुपक्ष्यांसह माणसांनाही त्रास सहन करावा लागतो. काही वेळा अनेकांना आपले प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी काल रिपाइंच्या वतीने पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

शहरात मोठ्या प्रमाणात चायना असलेल्या नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. पतंग शौकीन पतंग उडवितांना या मांजाचा सर्रास वापर करतांना दिसत आहे. अनेकदा मांजा समोर असतो मात्र जाणाऱ्यांना तो मांजा दिसत नाही त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरीक, बालके व मोटारसायकलस्वारांना या मांज्यामुळे जखमी होण्याचे प्रकार घडत आहे तर काही वेळेस प्राणास देखील मुकावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे सदर नायलॉन मांजा विक्री तात्काळ बंद करण्यात यावी. तसेच दुकानात असलेला चायना नायलॉन मांजा जप्त करत दुकानदारावर कडक कारवाई करावी. यापुढे जर शहरात नायलॉन मांजा विक्री करतांना कोणी दिसले तर त्या दुकानात जाऊन रिपाइं स्वतः त्या दुकानातील मांजा जप्त करून आंदोलन छेडेल असा इशारा दिला आहे. शहरात छुप्या पद्धतीने होणाऱ्या मांजा विक्रीवर प्रतिबंध लावून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी पालिका प्रशासन अधिकारी अशोक पाईक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगादादा त्रिभुवन, सचिव विलास आहिरे, पी आर निळे, रुपेश आहिरे, सुरेश शिंदे, सुशील खरे, नाना आहिरे, गुरू निकाळे, सुरेश जगताप, बाळासाहेब मोरे, चंद्रमनी उबाळे, कृष्णा पगारे, महेंद्र वाघ यांच्यासह रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.