loader image
[ays_poll id=7]

स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताच नाही – आम्ही नांदगावकर काढणार आज तिरडीयात्रा

Nov 24, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव शहरातील स्मशानभुमीच्या रस्त्यासाठी आज दि. २४ नोव्हेबर रोजी नांदगावकर नागरिकांकडून तिरडीयात्रा आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत वृत असे की नांदगाव शहरातील हिंदु समाजासाठी नगरपालिकेच्या दोन अधिकृत स्मशानभुमी आहे . आजमितीला दोन्ही स्मशानभुमीत अंत्ययात्रा नेण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहे.
शहरातील मुख्य स्मशानभुमी ला जाण्यासाठी शाकांबरी नदीतून जावे लागते . याच स्मशान भुमी च्या पुढे वडाळकर वस्ती,पठाडे वस्ती, एकलव्य वस्ती असून या ठिकाणी मोठया प्रमाणावर नागरिक राहत असून या नागरिकांना जाण्यासाठी कुठलाच रस्ता उपलब्ध नाही. अंत्ययात्रेत सुद्वा नदीच्या पाण्यातून जावे लागते . या विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधावे म्हणून शहरातील आम्ही नांदगावकर यांच्या वतीने संतोष गुप्ता,वाल्मीक टिळेकर,विशाल वडघुले,सागर आहेर,प्रविण सोमासे आदीनी प्रतिकात्मक तिरडीयात्रा व सरणावर बसून अंत्ययात्रा काढण्याचा इशारा दिला आहे . सदर आंदोलन हे हुतात्मा चौक ते विवेक हॉस्पीटल मार्गे स्मशानभुमी पर्यंत होणार आहे.
तसेच शहरातील पच्छिम भागातील नागरिकांसाठी मार्केट कमेटी जवळ असलेल्या स्मशान भुमीला जाण्यासाठी रस्ता रेल्वेच्या तिसऱ्या लाईन च्या कामामुळे सुमारे सहा महिन्यापासुन बंद आहे.
सदर आंदोलनात नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आम्ही नांदगावकर या मथळयाखाली संतोष गुप्ता,वाल्मिक टिळेकर,विशाल वडघुले यांनी केले आहे .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.