नांदगावला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटा तर्फे आमरण उपोषण
मागण्या मान्य झाल्या नाही तर पॅंथर स्टाईलने पळता भुई करु
जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे
नांदगाव तहसील कार्यालयासमोर रिपाईचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकरभाई धिवर यांनी दिव्यांग गरीब,विधवा, गरजु, वंचित जनतेचे रेशनिंग संदर्भात अमरण उपोषणाचा बडगा उगारला
दिव्यांग ,विधवा, वयवृध्द, गोरगरीब जनतेचे प्रलंबित असलेल अंत्योदय शीधा पत्रीका त्वरीत मिळाव्यात .ज्या गरजुंना शिधा पत्रिका मिळाल्या त्यांच्या शिधा पत्रिका आॅनलाईन त्वरीत करून अन्न धान्यांचा लाभ मिळावा
रेशनिंग संबंधित अधिकारी काम करण्यास टाळाटाळ करतात अशा अधिकार्यांवर कार्यवाही करावी
अशा अनेक मागण्यांसाठी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष मा. प्रकाशभाई लोंढे,
ग्रामिण जिल्हा अध्यक्ष मा. राजाभाऊ आहिरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकर भाई धिवर हे उपोषणास बसले होते.
जिल्हानेते देविदास आण्णा पवार,तालुका अध्यक्ष कैलासभाऊ आहिरे,मनमाड शहर अध्यक्ष दिलीप भाऊ नरवडे, युवक तालुका अध्यक्ष गुरू निकाळे, मनमाड शहर सचिव ऍड.प्रमोद आहिरे,नांदगाव शहर महिला जिल्हा अध्यक्ष मनाली ताई जाधव,मंदाताई भोसले,रुख्मिणिताई आहिरे,कमलताई खरात,अरूंनाताई जाधव,मंगला ताई सोनवणे, अध्यक्ष महावीर (नाना) जाधव , राजाभाऊ गुडेकर युवा नेते महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अध्यक्ष, मनालीताई जाधव आदि रिपाइंचे महिला कार्यकर्त्या व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
लेखी आश्वासन तहसिलदार सिध्दार्थ मोरे यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषणास काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार संघटना तसेच विविध संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे.












