loader image
[ays_poll id=7]

श्री नांदेश्वर महादेव मंदीरात देव दिपावली उत्सव साजरा

Nov 25, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव शहरातील शांकाबरी नदीच्या तिरावर श्री माधवनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन व त्यांनी जीर्णोद्धार केलेले प्राचिन अशा श्री नांदेश्वर महादेव मंदिरात देव दिपावली चा उत्सव मोठया उत्साहात साजरा झाला यावेळी मंदीराच्या परिसर सुमारे ३००० पणत्यानी सुशोभीत करण्यात आला. मंदीराच्या प्रांगणात आर्कषक रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी नांदगाव शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे व मंदीराचे सेवेकरी गणेश सोर यांच्या हस्ते महाआरती करण्यात येवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .

श्री नांदेश्वर महादेव मंदीरात श्री माधवनाथ महाराज अन्नछत्र मंडळ व समस्त सेवेकरी हे गेल्या ७ वर्षांपासून देवदिपावली उत्सव अतिशय सुंदर पध्दतीने साजरा करतात.यावेळी श्री नांदेश्वर महादेवांचा मुकुट स्थापन केला जातो ;महाआरती करून प्रसाद वाटप केले जाते. मंदिरातील सर्व सेवेकरीनी यासाठी परीश्रम घेतले. हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.


अजून बातम्या वाचा..

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.