loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात रक्त तपासणी शिबिर संपन्न

Nov 26, 2022


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे मा. प्राचार्य डॉ. ए. व्ही.पाटील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील महिला विकास समिती, राष्ट्रीय सेवा योजना, अंतर्गत गुणवत्ता मूल्यमापन कक्ष व लायन्स क्लब ऑफ रणरागिणी मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी रक्त तपासणी शिबिर संपन्न झाले.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ.ए. व्ही .पाटील यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. विद्यार्थिनींनी योग्य व सकस आहार वेळेवर घेतल्यामुळे शरीर सक्षम बनते व आपल्या उज्वल भविष्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे व त्यासाठी त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी या करिता विद्यार्थिनींना आवाहन केले. त्याचबरोबर निरोगी स्त्री व निरोगी समाज या विषयाची संकल्पना मांडली
याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ रणरागिणी मनमाडच्या सर्व सदस्या, लायन डॉ.भारत जगताप व लायन श्री राजेंद्र माळी यांचा सत्कार करण्यात आला. फर्स्ट व्ही.पी श्रीमती अलकाताई शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलींनी फास्ट फूड पासून लांब राहणे उचित ठरेल असा सल्ला दिला. त्याचबरोबर फळे व भाज्या यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे असे आग्रहाने सांगितले. झे.सी.सौ साधना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना निरोगी कन्या उत्तम माता बनू शकते व त्यामुळे निरोगी समाजाची निर्मिती होऊ शकते पण त्यासाठी उत्तम आहार व व्यायाम याची गरज आहे असे प्रतिपादन केले.
लायन डॉक्टर भारत जगताप व कुमारी श्वेता जगताप यांनी रक्त तपासणीसाठी मोलाचे सहकार्य केले.
या शिबिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विकास समितीच्या अध्यक्षा सौ प्राध्यापिका कविता काखंडकी यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. गणेश गांगुर्डे यांनी केले.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महिला विकास समितीच्या सर्व सदस्या व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी, डॉ.गणेश गांगुर्डे व प्रा. वर्षाराणी पेढेकर यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे,प्राध्यापक वृंद, महिला विकास समिती सदस्या,कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर लायन्स क्लब ऑफ रणरागिणी च्या अध्यक्षा सौ वृषाली गटणे, कोषाध्यक्षा श्रीमती रजनी सूळ व सदस्या सौ अनिता वाढवणे, सौ सुवर्णा निकम,सौ जयश्री कुंभार, सौ जयश्री सुर्वे , सौ वैशाली कुलकर्णी , सौ शिल्पा बत्रा, सौ रेखा पाईक,प्रजापिता ब्रह्मकुमारी शितल दीदी उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.