loader image
[ays_poll id=7]

के.आर टी.शाळेच्या अश्विनकुमार गीते ह्याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Nov 26, 2022

भगूर येथे बलकवडे व्यायाम शाळा येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २५ नोव्हेंबर २०२२ रोजी पार पडल्या. या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मनमाड येथील कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूलचा विदयार्थी अश्विनकुमार प्रल्हाद गिते या विदयार्थ्यांने १४ वर्षाखालील व ६२ किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अतिशय चमकदार कामगिरी केली. त्याच्या ६२ किलो वजनी गटातील सर्व सामन्यात अत्यंत चुरशीची लढत देत आपल्या बुध्दी आणि शक्ती यांचा मेळ घालत व उत्तम पकड आणि डाव टाकत शेवटी अंतिम सामन्यात मजल मारली आणि अंतिम सामना जिंकला. त्याच्या या उत्तम कामगिरीमुळे त्याची कुस्तीसाठी विभागीय पातळीवर निवड झालेली आहे.

अश्विनकुमार गिते यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, संस्थेचे श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निंभोरकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व विभागीयस्तरावरील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अश्विनकुमार गिते हा वीर सावरकर जिमखान्यात सराव करीत असून त्याला शाळेचे क्रीडाशिक्षक श्री.विशाल झाल्टे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
.