जिल्हयातील सर्व अवैध व्यवसायांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून श्री शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय विरोधी मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या,
जिल्हयातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्याचे दृष्टीकोनातून दिनांक 16/11/2022 पासून ग्रामीण जिल्हा मुख्यालयाकडून आणखी (8) पथके पाठवून कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हयात चालणान्या अवैध प्रवाशी वाहतुकीस आळा घालण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडूनही कारवाई सुरु करण्यात आली आहे. सदर सूचनांनुसार नाशिक ग्रामीण जिल्लायातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व विशेष पथके यांनी दिनांक 01/11/2022 ते 23/11/2022 यादरम्यान दारुबंदी जुगार, अवैध वाळू अंमली पदार्थ विरोधी कायदयातंर्गत खालील प्रमाणे भरीव कामगीरी केली आहे.
शिर्षक | दाखल केसेस | आरोपी | जप्त मुद्देमाल |
दारुबंदी | २६४ | 270 | 22,14,474 |
जुगार | 50 | 87 | 12,07,799 |
एनडीपीएस | 01 | 02 | 3,80,000 |
अवैध गुटखा विक्री | 02 | 02 | 67,994 |
अवैध बायोडिझेल | 01 | 05 | 1,01,68,248 |
अवैध वाळू वाहतुक | 01 | 01 | 4,09,000 |
अवैध अग्नीशस्त्र बाळगणे | 01 | 02 | 71,000 |
हॉटेल व ढाबा कारवाई | 01 | 01 | — |
एकूण | 321 | 370 | 1,45,18,515 |
नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायांविरोधी एकूण (321) केसेस दाखल करुन एकूण रुपये 1,45,18,5150/- रक्कमेचा गांजा, दारू, गुटखा, बायोडिझेल, अवैध वाळू व जुगार रक्कम हस्तगत केली असुन एकूण (370) आरोपींविरुध्द कारवाई केली आहे. जिल्हयात चालणाऱ्या अवैध व्यवसायाविषयी नागरिकांना काही माहिती द्यावयाची
असल्यास Helpline क्रमांक 6262 256363 यावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन श्री शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांनी केले आहे.