राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित इंडियन हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेह मिलन कार्यक्रमास लोकसभेच्या माजी सभापती सुमित्राताई महाजन उपस्थित राहणार आहे.
मनमाड शहरातील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित इंडियन हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवास लोकसभेच्या माजी सभापती सुमित्राताई महाजन अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून, ज्येष्ठ कवी व माजी विद्यार्थी अशोक नायगावकर, नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे, नासिक शिक्षण प्रसारक मंडळाचे राजेंद्र कलाल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. शताब्दी महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा 30 नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी दहा वाजता पल्लवी मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे.
यासाठीच्या पूर्वतयारीत संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संचालक, माजी विद्यार्थ्यांची लगबग सुरू असून जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. वि.छ. मालते, किशोर चोरडिया, राजेंद्र गुप्ता, विकास काकडे, डॉ. नूतन पहाडे, देवराम सदगीर, हेमंत गवळे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका क्रांती कुंजरकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अरुणा शेवाळे आदींनी केले आहे.












