loader image
[ays_poll id=7]

विक्रम गोखले – मी पाहिलेला भला माणूस : संदीप देशपांडे

Nov 27, 2022


मी पाहिलेला भला माणूस आता उरल्या आठवणी

नाशिक कालिदास कला मंदिरात संकेत मिलनाचा नाटक….. मी तेव्हा देशदूत मध्ये जर्नालिझम इन्ट्रान्सशिप करत असताना विक्रम गोखले यांची मुलाखत घ्यायला गेलो होतो.. नाटक संपल्यावर अनेक जण विक्रम गोखले या आवडीच्या नटाची मुलाखत घेण्यासाठी थांबलेले…. पण प्रत्येकाच्या हातात 2 रुपयांची नोट…. पैसे घेऊन सही करणाऱ्या या अभिनेत्याला पाहून रागच आला. पत्रकार जागा झाला माझ्यातला… म्हटलं थेट त्यांना… पैसे घेतात तुम्ही सहीचे? योग्य का हे?

ते म्हणाले मुलाखत घ्यायची का ? त्याचे पैसे द्यावे लागतील…. मी दहाची नोट काढली, म्हटलं घ्या… पण हे चुकीचे… आम्ही लोक मोठे करतो तुम्हाला…. आणि तुम्ही

पैसे….. लगेचच या अभिनेत्याने छद्मी हसत पाहिले… एक बॅग काढली… पावती पुस्तक काढले… अंधमित्र संस्था पुणे नावाने पावती फाडून हातात ठेवली. म्हणाले लोक अंधांसाठी 2 रुपये नाही देत…पण नट विक्रम गोखले साठी 10 रुपये देतात….. मी निशब्द… चांगली चपराक बसली… अभिनेत्यांतील भला

माणूस पाहून नतमस्तक झालो..बरेच काही शिकलो… मुलाखत झाल्यावर विक्रम गोखले माझ्या बरोबर चहा प्यायला शालिमार ला एका चहा टपरी वर आले होते. मला म्हणाले होते. गुणी आहेस पण कोणत्याही गोष्टीकडे पाहताना आधी चांगला दृष्टिकोन असू दे मित्रा…….


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.