loader image
[ays_poll id=7]

लासूर रेल्वे स्थानकावर एकाच ट्रॅकवर दोन रेल्वे गाड्या ; चालकाने गाडी थांबवत टाळला अनर्थ

Nov 27, 2022


औरंगाबाद जवळ असलेल्या लासूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर दोन रेल्वेगाड्या समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. काय घडतय कोणालच काही कळत नव्हते. मात्र रेल्वे स्थानक आल्याने अगोदरच कमी स्पीड असलेल्या रेल्वे चालकाने गाडी थांबविली आणि मोठा अनर्थ टळला. आता यात कोणाची चुकी होती याची चौकशी रेल्वे विभागाकडून सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत असे समजते की शुक्रवारी रात्री सव्वासातच्या सुमारास जालना नगरसूल डेमो पॅसेंजर (07492) दोन नंबरच्या ट्रॅकवर जाण्याऐवजी एक नंबर प्लॅटफॉर्मवर आली. मात्र, त्या अगोदर समोरून त्याच प्लॅटफॉर्मवर रेल्वेच्याच विद्युतीकरण कामाची स्पेशल दोन डब्यांची रेल्वेगाडी उभी होती. दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर आल्याने काही वेळेसाठी गोंधळ उडाला. दरवाज्यात उभे असलेल्या प्रवाशांना समोर उभी असलेली रेल्वे दिसल्याने त्यांच्या काळजाचा ठोका उडाला. काय होतेय कोणालाच कळत नव्हते. मात्र रेल्वे स्थानक आल्याने अगोदरच कमी स्पीड असलेल्या डेमोच्या पॅसेंजरच्या चालकाने गाडी थांबविली. त्यामुळे गाडी थांबली मात्र दोन्ही रेल्वे गाड्यांत अवघे दोन ते तीन फुटाचे अंतर उरले होते. त्यानंतर रेल्वेने डेमो पॅसेंजरला पुन्हा मागे घेऊन दोन नंबर ट्रॅकवर आणले. सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही.

दोषींवर काय कारवाई होणार?

याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र या संदर्भात सिग्नल प्रणालीच्या तांत्रिक विभागाचे अधिकारी हे कस झाले याची तपासणी करीत असून, यात नेमकं कोण दोषी की तांत्रिक बिघाड हे स्पष्ट होईल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.