loader image
[ays_poll id=7]

अधिकार आणि कर्तव्याचा लोकांना विसर – ॲड. विष्णू ढोबळे

Nov 28, 2022


नांदगाव ( प्रतिनिधी) आज लोकांना अधिकार व कर्तव्ये यांचा विसर पडत चालला आहे. देशाची नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सार्वजनिक क्षेत्रातील चळवळी ठप्प पडल्या आहेत. देशासमोर अनेक प्रश्न विविध आव्हाने आहेत. त्यासाठी संविधान जागृती करणे आज काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन समाजवादी जनपरिषदेचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबाद उच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील ॳॅड.विष्णू ढोबळे यांनी केले.
संविधान दिनी नांदगाव येथे संविधान गौरव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या व्याख्यानात ॳॅड. विष्णू ढोबळे बोलत होते. समितीच्या वतीने येथील गुप्ता लाॅन्स पासून संविधान गौरव समितीने भव्य शोभायात्रा काढली होती
या शोभायात्रेची सांगता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन झाली. या निमित्ताने भारतीय संविधान या विषयावर ॳॅड.विष्ण ढोबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.सुरेश नारायणे होते.
ॳॅड.ढोबळे म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विविध जातीपाती,धर्मासह,भाषा,प्रांत यांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य भारतीय संविधानात आहे.प्रा.जावेद शेख यांनीही मनोगतात भारतीय संविधानाचे महत्व विषद केले. प्रा. नारायणे यांनी उपस्थितासह भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे वाचन केले. सभेपुर्वी गीतकार मनोज निकम,व कु.प्रज्ञा यांनी संविधान प्रती गीत गायन करुन सभेत उत्साह निर्माण केला. यावेळी संविधान गौरव समिती तर्फे उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधानाच्या प्रतीं भेट देण्यात आल्या.
यावेळी शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख, औरंगाबाद येथील रंजन दाणी,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक,राजेश कवडे, राष्ट्रवादीचे विनोद शेलार, डॉ.वाय.पी.जाधव,विलास कोतकर,अरुण साळवे,देवीदास पवार,विश्वास अहिरे,रंजना अहिरे, राजेंद्र गांगुर्डे,निर्मला केदारे, जयश्री डोळे,शबाना मन्सुरी,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. वाल्मिक जगताप यांनी प्रास्ताविक केले.ॳॅड.सचिन साळवे आणि प्रा. अनिल कोतकर यांनी सूत्रसंचालन केले.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
.