loader image
[ays_poll id=7]

संभाजीनगर अहमदनगर मार्गावर एस. टी बस ने बैलगाडीला दिलेल्या धडकेत नांदगाव तालुक्यातील गणेशनगर येथील माय लेकाचा जागीच मुत्यू

Nov 30, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

औरंगाबाद (संभाजीनगर ) अहमदनगर मार्गावर एस टी व ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीचा अपघात होऊन नांदगाव तालुक्यातील गणेशनगर येथील ऊस तोड कामगार कलीयाबाई गोविंद गिरे व अर्जुन गोविंद गिरे या माय लेकाचा जागीच मुत्यू झाला तर गोविंद विठ्ठल गिरे,बाळू गोविंद गिरे हे वडील व मुलगा जबर जखमी झाले .

याबाबत अधिक माहिती अशी की नांदगाव तालुक्यातील ऊस तोड कामगार मोठया प्रमाणावर ऊस तोडण्यासाठी कारखान्यावर जात असतात. गणेशनगर येथील शेकडो कामगार कारखान्यावर गेले आहेत . यातील गोविंद विठ्ठल गिरे हा कामगार आपल्या पत्नी व दोन मुलासह ऊस तोडणीसाठी कारखान्यावर गेला होता .आज पहाटे ६ वाजता तो आपल्या बैलगाडीने औरगांबाद नगर महामार्गावरील इसारवाडी फाट्याच्या जवळ असलेल्या इंडियन हॉटेलजवळून जात असतानां गंगापूर आगाराच्या (क्रंमाक एम . एच . १४ बीटी २५००) या बसने बैलगाडीला जोराची धड़क दिली. बसचा वेग अधिक असल्याने बैलगाडीचा अक्षरश: चुराडा झाला . अपघातात दोन्ही बैलाचा जागीच मुत्यू झाला तर बैलगाडीत बसलेल्या आई व मुलाचा जागीच मुत्यू झाला. तर बैलगाडी चालवत असलेले गोविंद गिरे व बाळू गिरे हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती आहे.
औरंगाबाद अहमदनगर मार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी असते . अपघात झाल्यावर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
मृत माय लेका वर रात्री उशीरा गणेशनगर ता . नांदगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहीती सामाजीक कार्यकर्ते विष्णू मेंगाळ यांनी दिली.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.