loader image
[ays_poll id=7]

शिवसेना कुणाची? आता सुनावणी १२ डिसेंबर रोजी

Nov 30, 2022


शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरे यांची? या संबंधी महत्त्वाची सुनावणी पुढील महिन्यात पार पडणार आहे. निवडणूक आयोगासमोर येत्या 12 डिसेंबर रोजी ही सुनावणी होईल, अशी माहिती समोर आली आहे. ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांचे वकील निवडणूक आयोगासमोर या दिवशी युक्तिवाद करतील. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवले होते. तसेच दोन्ही गटांना वेगळी नावे सुद्धा देण्यात आली होती. आता येत्या 12 डिसेंबरला शिवसेनेवर कुणाचा दावा प्रबळ ठरतोय, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागुन आहे.
शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना पक्षावर दावा सांगण्याकरिता पुरावे म्हणून सर्व कागदपत्रे सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. २३ नोव्हेंबरला ही मुदत संपली. दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे महत्त्वाचे पुरावे सादरही करण्यात आले आहेत.

शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यानंतर आमदार अपात्रतेचा आणि शिवसेना पक्षाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला. मात्र कोर्टाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्ह गोठवलं. त्यानंतर दोन्ही पक्षांना नावं आणि चिन्ह देण्यात आली.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं.
या दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची छानणी आता केली जाईल. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी पहिली सुनावणी केली जाईल. या सुनावणीवेळीही अंतिम निकाल लागण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, काही महापालिका निवडणुकांपूर्वीही शिवसेना पक्षचिन्हाचा वाद सुटला नाही तर दोन्ही गटातील नेत्यांना ढाल तलवार आणि मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल, अशी शक्यता आहे.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.