loader image

एडस दिन – प्रा. सुरेश नारायणे, नांदगाव यांची कवीता

Dec 1, 2022


एड्स

आयुष्याला निरोप देण्यासाठी
मोजतोय मी घटका
कुणी सुटका करता का
या एड्स पासून

हे तुफान घराघरात- दारादारात
मानवाच्या शरीरात घर करत आहे
यात कुणी वाचणार नाही
असा हुंकार देत आहे
निष्काळजीपणाचा कळस केला तर
बसेल एकदम झटका
कुणी सुटका करता का सुटका
या एड्स पासून?

खरंच सांगतो बाबांनो
हा एड्स दिवसागणिक वाढतच आहे

असुरक्षित लैंगिक संबंधातून
एच.आय.व्ही. बाधीत रक्तातून
निर्जंतुक न केलेल्या सुयांतुन
ताकही आता फुंकूनच प्या
नाहीतर बसेल चटका

कुणी सुटका करता का सुटका
या एड्स पासून?

खरंच सांगतो बाबांनो!
या तुफानाला अडविण्यासाठी
जीवन सौख्यमय होण्यासाठी
रामासारख पत्नीव्रत घ्या
नव्या सुईचा आग्रह धरा
बाधीत रक्ताला दूर सारा

एड्सरुपी राक्षसाचा विळखा पडण्याआधी
जनजागरणाचा डोक्यात पडू द्या खटका

म्हणजे म्हणावं लागणार नाही
कुणी सुटका करता का सुटका?
या एड्सपासून?

प्रा. सुरेश नारायणे, नांदगाव


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.