loader image
[ays_poll id=7]

नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या 348 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

Dec 1, 2022

मुंबई, दि. 30: ​मुंबई, दि. 30: नाशिक शहरातील लोकसंख्या विचारात घेऊन येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात आल्या असून या दोन्हींसाठी दिनांक 29 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या शासन निर्णयानवये 348 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

नाशिक येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यासाठी सन 2016- 2019 या कालावधीत तत्वत: मान्यता देण्यात आली होती. यानंतर या दोन्ही संस्था सुरु करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. 5 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात आली. यामुळे रुग्णांना मुंबई किंवा पुण्याऐवजी नाशिक येथेच विविध आजारांवरील विशेषोपचार व अतिविशेषोपचार सोय उपलब्ध होणारआहे. 29 नोव्हेंबर 2022 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार या दोन्हींसाठी 348 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.नाशिक येथे शासनाचे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्याकरिता केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री खा.भारतीताई पवार, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे,आमदार राहुल ढिकले, आमदार राहुल आहेर पाठपुरावा करत होते.

नाशिक येथील नागरिकांना त्यांच्या शहरातच विशेषोपचार व अतिविशेषोपचार सुविधा शासनाच्या माध्यमातून माफक दरात उपलब्ध होतील.तसेच दरवर्षी नवीन 100 डॉक्टर जनतेसाठी नव्याने उपलब्ध होणार असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
.