काल पासून बेपत्ता असलेला मनमाडचा नऊ वर्षाच्या बालकाची निर्घुण पणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार शहरात घडल्याने खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील मध्यवस्तीतील भिलाटी परिसरात राहणाऱ्या लोकेश सुनील सोनवणे हा काल सायंकाळ पासून बेपत्ता होता. घरच्या मंडळींनी सर्व ठिकाणी शोध घेऊनही तो सापडला नाही. घरच्यांनी अखेर पोलिसात हरवल्याची नोंद दाखल केल्यानंतर पोलिस आज सकाळ पासून ह्या मुलाचा कसून शोध घेत होते.सायंकाळी ४ च्या सुमारास रेल्वे फिल्टर हाऊस जवळ त्याचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळला. ह्याच ठिकाणी एक करवत सुद्धा सापडली असून आरोपीबद्दल महत्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत.
कंचन सुधा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट
मनमाड शहरालगतच असलेल्या कंचन सुधा इंटरनॅशनल स्कूल, शिंगवेच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तकी...











