loader image

अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या – नांदगाव ला आदिवासी सेनेचा मोर्चा

Dec 2, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नाशिकच्या म्हसरूळ येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील अल्पवयीन आदिवासी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेधार्थ आज आदिवासी आदिम सेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला..डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली..मोर्चाचे नेतृत्व आदिम सेनेच्या जयश्री डोळे व आधार बहुद्देशीय संस्थेच्या ॲड.विद्या कसबे यांनी केले.आदिवासी मुला – मुलींना मोफत शिक्षणाचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या ज्ञानदीप गुरुकुल आश्रमाच्या नराधम संचालक बाळकृष्ण मोरेवर पोस्को, तसेच ॲट्रासिटी सारखे गुन्हे दाखल करावे, त्याला फाशीची शिक्षा व्हावी त्याचे अन्य फरार असलेले सहा साथीदार यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली..दरम्यान, ज्ञानदीप गुरुकुल आश्रमसारखे जिल्ह्यात अनेक आश्रम आहेत.त्यांचेवर नेमके लक्ष कोण ठेवते ? राज्य शासनाची बाल कल्याण समीती व महिला बालकल्याण विभाग नेमका करतो काय ? असा संतप्त सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला..तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना यावेळी निवेदन देण्यात आले..निवेदनाचा आशय असा की, नाशिक शहरातील व जिल्ह्यातील गरीब आदिवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहे.याचा फायदा घेवून अशा आदिवासी समाजाच्या मुला – मुलींना मोफत शिक्षणाचे आमिष दाखवून ज्ञानदीप गुरुकुल आश्रमाचा संचालक बाळकृष्ण मोरे याने काही आदिवासी मुला – मुलींना स्वतःच्या ज्ञानदिप गुरुकुल आश्रमात ठेवले.बाळकृष्ण मोरे यांनी कोणतीही शासकिय परवानगी न घेता सदर गुरुकुल आश्रम सुरु केला.त्यामध्ये अल्पवयीन मुलीना ठेवले व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले.तसेच त्यांच्या कुटुंबियांना धमकावले.शासनाची परवानगी न घेता अशी गुरुकुल किंवा आश्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नाव देवून त्याचे शोषन होते. मग बाल कल्याण समिती व महिला बाल कल्याण विभाग काय करतो ? शोषण करणारे गुरुकुल कोणाच्या आश्रयाने व निधीने चालतात त्यांचा शोध घेण्यात यावा.आदिवासी अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी..त्यात दोषी आढळणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी व त्याला मदत करणान्या त्याच्या साथीदारांना त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला..या निषेध आंदोलनाला आरपीआय, काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांनी पाठिंबा दर्शविला..या आंदोलनात आदिवासी आदिम सेनेच्या जयश्री डोळे, आधार बहुद्देशीय संस्थेच्या ॲड.विद्या कसबे, योगिता सोनवणे, नेहा कोळगे, शबाना मन्सुरी, वाल्मीक जगताप, महावीर जाधव, मनोज चोपडे, युवराज डोळे, अरुण सापटे, रामा वाघिरे ,चेतन भसरे, गजानन भोई, ताईबाई धूम, पायल डोळे, रंजना डोळे, अंजुळाबाई कुवर, परिघना कूवर, सरला डोळे आदी मोर्चात सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.