Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड रेल्वे कॉलनीत दररोज पाणीपुरवठा करण्याचे लाहोटी यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

Dec 3, 2022

मनमाड रेल्वे कॉलनी मध्ये दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन मध्य रेल्वे चे जनरल मॅनेजर अनिल कुमार लाहोटी यांनी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ मनमाड च्या शिष्टमंडळानाला दिला
मध्य रेल्वे चे जनरल मॅनेजर अनिल कुमार लाहोटी हे मनमाड वर्कशॉप च्या दौरांवर आले असता ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या शिष्टमंडळाने झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला मनमाड वर्कशॉप मधील कामासंदर्भात निवेदन देण्यात आले.

प्रधान मुख्य इंजिनिअर (मुंबई)राजेश अरोरा,सी.ए.ओ.(मुंबई) मनोज कुमार शर्मा, सिनियर डि.ई.एन.(मुंबई) तरूण कुमार दंडोतिया, भुसावळ मंडळाचे रेल्वे प्रबंधक एस.एस.केडिया, कारखाना प्रबंधक मयंक सिंह आदी प्रशासिकीय अधिकारी उपस्थित होते.
निवेदनामध्ये मनमाड वर्कशॉप कच्च्या मालाचा नियमित पुरवठा करण्यात येवा, मनमाड नाशिक अप डाऊन रेल्वे कर्मचारी वर्गासाठी विशेष पास देण्यात यावा, नवीन कर्मचारी मनमाड वर्कशॉप देण्यात यावे , नवीन वर्क ऑर्डर देण्यात यावी.आदि मागण्यांचा समावेश करण्यात आला होता.
यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, सहाय्यक सचिव सुनिल सोनवणे, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, रविंद्र पगारे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर,सागर साळवे, किरण आहीरे, हर्षद सुर्यवंशी, विलास कराड,सचिन इंगळे,जॉय देठे, दिपक राऊत, पंढरीनाथ पठारे, संदिप पगारे,बबन कसबे विशाल त्रिभुवन गणेश केदारे,केतन गवळी, फकिरा सोनवणे, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

भारतात सोने-चांदीची मागणी नेहमीच मजबूत असते. मात्र, या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात परदेशातून...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]