loader image
[ays_poll id=7]

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

Dec 6, 2022

संत ज्ञानेश्वर विद्यालय तळेगाव रोहीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ साधना संसारे होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली.व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी व शिक्षक श्री. दीपक काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ, समाज सुधारक होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना संबोधले जाते. त्यांनी जातीभेद व अन्यायाविरुद्ध लढा दिला. मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ,कायदे पंडित राजनीतिज्ञ,लेखक,समाज सुधारक,स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक,दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा,उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाज हितासाठी करणारा महामानव.आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्यरत्न. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे सांगितले. तर मुख्याध्यापिका सौ. साधना संसारे व शिक्षक श्री सूर्यकांत महाले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूर्यकांत महाले सर यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रवीण मोरे सर यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
.