गेल्या आठवड्यात नांदगाव येथील मदरसा रौजतुल उलूम येथील मदरसा मधून गायब झालेल्या इम्रान मोहम्मद हमीद अन्सारी ह्या मुलाचा शोध लावण्यास नांदगाव पोलिसांना यश आले असून मुलाच्या आजीने दिलेल्या फिर्यादी नंतर नांदगाव पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीवर अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. नांदगाव पोलिस प्रशासनाने तात्काळ सर्व तपास यंत्रणा कामाला लावून शोध सुरू केला असता मुलगा नासिक येथे मिळून आल्याने पोलिसांनी नाशिक येथील बाल न्याय मंडळ यांच्या मार्फत सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करून अपहरण झालेल्या मुलाचा ताबा त्याच्या आईला झायेदा मोहम्मद हनीफ अन्सारी यांना मिळवून दिला. पोलिसांच्या या कामगिरी बद्दल समाधान आणि कृतज्ञता व्यक्त करत मदरसा प्रशासनाच्या वतीने मौलाना अकील कास्मी, अध्यक्ष खलील जनाब, सय्यद आबीद, हाजी सईद, रियाज सर, आयाझभाई शेख,हाजी जहांगीर,हाजी मुनव्वर इत्यादींनी नांदगाव पोलीस स्टेशनचे पी.आय.गाढे साहेब, पोलिस निरिक्षक सुरळकर साहेब व इतर पोलीस सहकाऱ्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला.
राशी भविष्य : १० जून २०२५ – मंगळवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...






