loader image

मनमाड शहरात २४ तलवारी जप्त

Dec 9, 2022


मनमाड शहरात पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मनमाड शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी मनमाड शहरातील दत्तमंदिर रोडवरील मोठा गुपतसर गुरुद्वारा बाहेर लावलेल्या एका स्टॉलवरुन २३ अवैध तलवारी तसेच एका तरुणाला ताब्यात घेतले. ०१ असा एकुण अवैध २४ तलवारीचा शत्रसाठा जप्त केला आहे . याबाबत मनमाड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन गुन्हयात अवैध २४ तलवार व एक मोटारसायकल असा एकुण ९ ०,००० रुपयाचा मुद्देमाल दप्त केला आहे . सदर प्रकरणी संदिप बाळासाहेब पवार राहणार वडगांव पंगु ता.चांदवड जिल्हा नाशिक व चरणसिंग s / o भुपिंदरसिंग वय २७ वर्ष राहणार न्यु कोट , आत्माराम , सुलतानविंड रोड , अमृतसर या दोन इसमांना तलवार बाळगतांना तसेच विक्री करतांना आढळुन आल्याने ताब्यात घेण्यात आलेले आहे . सदरची कारवाई मा . श्री बी जी शेखर , विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र , मा.श्री.शहाजी उमाप , पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण , मा . श्री . अनिकेत भारती , अपर पोलीस अधिक्षक , मालेगांव , मा . श्री समिरसिंह साळवे , उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस स्टेशनचे सपोनि श्री प्रल्हाद गिते . पोना गणेश नरोटे , पोशि गौरव गांगुर्डे , पोशि राजेन्द्र खैरनार , पोशि रणजित चव्हाण चांदवड पोलीस स्टेशन कडील पोहवा पालवी , पो शि उत्तम गोसावी यांनी केली आहे .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.