loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडीओ – जातेगांव येथील स्वस्त धान्य दुकानदारास शिवीगाळ, ई पॉज मशीन फोडले गुन्हा दाखल ; राज्यभर निषेध

Dec 10, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील स्वस्त धान्य दुकान क्र ५७ चे संचालक सुभाष पोपट पवार यांना येथील स्वस्त धान्य दुकान क्र. ५६ चा ग्राहक आबा शिवराम राऊत याने व त्याच्या पत्नीने शिवीगाळ करुन धान्य वितरणाचे ई पॉज मशिन फोडल्यामुळे पवार यांच्या तक्रारी वरुन नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जातेगांव येथील सुभाष पोपट पवार यांच्याकडे येथील स्वस्त धान्याचे क्रमांक ५७ चे दुकान असुन त्यांच्याकडे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडे असलेले स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५६ च्या ग्राहकांच्या तक्रारींंमुळे चौकशी अंती निलंबित करण्यात आल्याने ग्राहकांची गैरसोय होवू नये म्हणून तात्पुरती व्यवस्था म्हणून सुभाष पवार यांच्या क्रमांक ५७ च्या दुकानाला डिसेंबर २०२१ पासून शासकीय आदेशानुसार जोडण्यात आले आहे.

तेव्हा पासून येथील गाव मोठे असल्याने व दोन्ही स्वस्त धान्य दुकानात गर्दी होवू नये . तसेच ग्राहकांचे गैरसोय होवू नये म्हणून, आठवड्यातील पहिले तीन दिवस तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आलेल्या स्वस्त धान्य क्र. ५६ च्या ग्राहकांना आणि गुरुवार शुक्रवार शनिवार या तीन दिवसांत क्र.५७ च्या असलेल्या ग्राहकांना धान्य वितरण करण्यात येत असतांना वरील व्यक्ती आबा राऊत हा शुक्रवारी दि. १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान स्वतः दारुच्या नशेत त्याच्या पत्नीला सोबत घेऊन आला. व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, त्याची समजूत काढून त्यास नोव्हेंबर महिन्याचे धान्य दिले असता राऊत यांनी मागील अक्टोंबर महिन्यातील देखील धान्य पाहिजे म्हणून वाद करण्यास सुरुवात केली. त्याची खात्री व्हावी म्हणून ई पॉज मशीनवर राऊत याच्या हाताच्या बोटा ठसा घेवून मागील महिण्याचे धान्य शिल्लक नसल्याचे लक्षात आणून दिले.

मला माझे धान्य पाहिजे असा हट्ट धरला व ई पॉज मशीन फेकून दिले. आणि मला धान्य दिले नाही तर माझ्या बायकोची छेडछाड केली म्हणून गुन्हा दाखल करील अशी धान्य दुकानात काम करणारे नंदू गोंधळे आणि विजय त्रिभुवन यांच्या समक्ष धमकी दिली. अशी तक्रार सुभाष पोपट पवार यांनी दिल्याने नांदगाव पोलीस ठाण्यात १०४९/२०२२ नुसार ५०५, ५०५, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन वरील घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, पोलीस हवालदार मोरे, पोलीस नाईक अनिल गांगुर्डे, प्रदिप बागुल हे करत आहे.

  • स्वस्त धान्य संघटनेकडून निषेध
    वरील घटनेचा स्वस्त धान्य संघटनेकडून निषेध करण्यात आला असून विनाकारण वाद करुन शिवीगाळ करुन ई पॉज मशीन फोडले असल्याने आबा शिवराम राऊत या व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून तहसीलदार नांदगाव यांना निवेदन देण्यात आले असून महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डोळसे पाटील व नाशिक जिल्हा स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला .असून स्वस्त धान्य दुकान संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोशल मीडियावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वरील व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून सोमवारी शिष्टमंडळ तहसीलदारांची भेट घेणार असल्याचे नांदगाव येथील धान्य दुकानदार संघटनेचे विजय इपर ‘ बळवंत जाधव ‘ दत्ता भावसार संतोष आहेर नाना घुगे यांनी सांगितले आहे

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.