राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जन्मोत्सव लोकनेत्याचा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत मनमाड शहरात शालेय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, गीतगायन स्पर्धा व सामान्यज्ञान स्पर्धांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दि.११ रोजी लोकमान्य हौल, इंडियन हायस्कूल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मनमाडचे मुळचे रहिवासी व कल्याण येथील असि.कमिशनर, विक्रीकर विभाग अभिजित भावसार हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिजित भावसार यांचा सपत्नीक तसेच त्यांचे वडील संभाजी भावसार, तालुकाध्यक्ष विजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष दीपक गोगड यांनी प्रास्ताविक करत या उपक्रमाचे महत्व सांगत मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरद पवार साहेबाना वाढदिवसाची भेट दिल्याचे सांगितले. अभिजित भावसार व तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व पवार साहेब, सर्व विद्यार्थ्यांना तसेच कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, नांदगाव येथील बाळासाहेब देहादराय, किसनराव जगधने, शिवाजी पाटील, महिला शहराध्यक्ष अपर्णाताई देशमुख, मा.नगराध्यक्ष प्रकाश बोधक,जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, सेवादल शहर अध्यक्ष संदीप जगताप, ओबीसीसेल शहर अध्यक्ष शुभम आहेर, श्रीराज कातकाडे, शहर उपाध्यक्ष जावेद शेख, पवन अहिरे, आनंद बोथरा, सौ.प्रियंका बोथरा, प्रतिक मोरे, आदि उपस्थित होते. सदर उपक्रमात सौ.उषा कातकाडे, कलाशिक्षक मिलिंद वाघ, राजेश पाटील, सुरेंद्र भुजंग, सचिन बिडवे, पगार सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या...