loader image
[ays_poll id=7]

मनमाड येथे महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार यांचा वाढदिवस साजरा

Dec 12, 2022


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस मनमाड येथे महाविकास आघाडीच्या वतीने साजरा करण्यात आला. मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकार्याना आमंत्रित करून केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस मनमाड शहराच्या वतीने आयोजित या अभिष्टचिंतन सोहळ्यास महाविकास आघाडीतील सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी तालुक्याचे माजी आमदार संजय पवार, मनमाड मार्केटचे माजी चेअरमन गंगाधर बिडगर, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, जिल्हा नेते संतोष बळीद, तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, काँग्रेसचे जेष्ठ नेते रहेमान शाह, बाळासाहेब साळुंके आदींनी आपल्या मनोगतात शरद पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांना एकसंघ सामोरे जाण्याचा मनोदय व्यक्त केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी तर्फे सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, विधानसभा संघटक महेंद्र परदेशी, युवक जिल्ह संघटक अमोल गांगुर्डे, मा.नगराध्यक्ष प्रकाश बोधक, हकीम शेख, शहर उपाध्यक्ष संदीप पाटील वयोगेश जाधव, खजिनदार योगेश शिंदे, सेवादल शहर अध्यक्ष संदीप जगताप, युवक शहर उपाध्यक्ष जावेद शेख, श्रीराज कातकाडे, पवन अहिरे, ओबिसी शहर अध्यक्ष शुभम आहेर, अक्षय देशमुख, आनंद बोथरा, प्रतिक मोरे, आदींनी प्रयत्न केले.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.