loader image
[ays_poll id=7]

नागपूर-पुणे प्रवास अवघ्या ६ तासांत, गडकरींकडून राज्यातील नव्या महामार्गाची घोषणा

Dec 12, 2022


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील एका नव्या महामार्गाची घोषणा केली आहे. या नव्या एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे प्रवास केवळ सहा तासांत शक्य होणार असल्याचे गडकरींनी सांगितले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प समृध्दी महामार्गाचा काल लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. सध्या नागपूर ते शिर्डी दरम्यान हा महामार्ग सुरु करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती दर्शवली. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील एका नव्या महामार्गाची घोषणा केली आहे. या नव्या एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे प्रवास केवळ सहा तासांत शक्य होणार असल्याचं गडकरींनी सांगितलं आहे. नव्याने होणार असणारा हा हाईवे औरंगाबाद ते पुणे शहरांना जोडणार आहे. या हायवेच्या बांधकामाचा लवकरच शुभारंभ होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

 

त्याच बरोबर राज्यात नव्याने सहा एक्सप्रेस हाईवे बांधण्यात येणार असल्याची घोषणा देखील गडकरींनी केली आहे. राज्यातील जनतेसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. कारण यामुळे व्यापार, दळणवळण, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि विविध बाबींना चालना मिळणार आहे. हल्ली नागपुर पुणे प्रवासासाठी किमान १५ तासांपेक्षा अधिक वेळ लागतो पण एकदा या नव्याने होणार असलेल्या हायवेचं बांधकाम पुर्ण झाल्यावर हे अंतर केवळ सहा तासात कापता येणार आहे.
तसेच या हायवेचा विदर्भा प्रमाणेचं मराठवाड्यातील जनतेला देखील मोठा फायदा होणार आहे. कारण सध्या औरंगाबाद ते पुणे हे अंतर कापण्यासाठी जवळपास पाच तासं लागतात पण हा हाईवे झाल्यानंतर या प्रवासास दोन तासही लागणार नाही. तरी हा मार्ग विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रास जोडण्यास अधिक सोयिस्कर ठरणार आहे.


अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.