loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा कांदे यांची इजतेमागाहला भेट

Dec 12, 2022


येत्या 15-16 तारखेला नाशिक जिल्ह्याचा तब्लिग जमातचा जिल्हास्तरीय इजतेमा मालेगाव येथील सायना भागातील स्पिनिंग मिल परिसरात होणार आहे, इजतेमाची तयारी अंतिम टप्प्यात असून आपल्या नांदगाव मतदार संघातील मुस्लीम बांधवांच्या आग्रहास्तव सुहास आण्णा कांदे साहेबांनी इजतेमागाहला भेट देत इजतेमाच्या जागेची पाहणी केली, आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनाची आणि स्वयंसेवकांनी खासकरून मालेगावच्या मजूर वर्गाने अहोरात्र श्रमदान करून सुंदर भव्य मंडप उभारल्या बद्दल सर्वांचे कौतुक केले या शुभ कार्यात माझाही काही खारीचा वाटा असू द्यावा, माझ्यासाठी काही जबाबदारी काही सेवा असेल तर निसंकोच आदेश करा, काही मदत हवी असेल तर सांगा अशी दिलखुलास चर्चा आयोजाकांशी केली, आयोजकांनी आवश्यकता भासल्यास जरुर कळवू असे आश्वासन दिले
नाशिक जिल्हास्तरीय इजतेमा आयोजक समितीचे प्रमुख मालेगावचे हाजी हबीब साहेब यांनी शाल व खजूर भेट देत आमदार सुहास आण्णा कांदे साहेबांचा सत्कार केला, हाजी रफिक मनमाड यांनी सर्वांच्या वतीने आभार मानले आमदार साहेबांच्या अचानक दिलेल्या भेटीने नांदगाव,मनमाड, मालेगाव येथील स्वयंसेवकानी एकच गर्दी केली. याप्रसंगी तालुक्यातील सदस्य इम्रान पठाण, अजिज शेख, आयाज शेख, तनवीर सुपर, नगरसेवक अमीन पटेल असंख्य मुस्लीम बांधव उपस्थित होते, नांदगाव मतदार संघातील उपस्थित मुस्लीम बांधवांनी आण्णा साहेबांच्या कामाचे कौतुक केले त्यांच्या दिलदार, आदर्श व्यक्तिमत्त्वाची आयोजकांना परिचय करून देत त्यांनी दिलेल्या भेटी बद्दल सर्वच उपस्थीत मुस्लीम समाज बांधवांनी आनंद व समाधान व्यक्त केला.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.