loader image
[ays_poll id=7]

वातावरणातील बदलामुळे बळीराजा धास्तावला

Dec 13, 2022

दरेगाव -( गोरक्षनाथ लाड )गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांनी कांद्यासह गहू, हरभरा व इतर पिकांची लागवड केली आहे. अवकाळी पाऊस उघडल्यानंतर बऱ्यापैकी लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्यानंतर औषधांची फवारणी केल्याने कांदा पिकात सुधारणा झाली होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पिके पुन्हा पिवळी पडण्याबरोबरच त्यांच्यावर करपा व मावा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

या वातावरणामुळे शेतकऱ्यांपुढे समस्या निर्माण होत आहे. आपली पिके या वातावरणातून वाचविण्यासाठी शेतकरी किटकनाशके, बुरशीनाशके यांची फवारणी करताना दिसत आहेत. परिणामी, पिकांवर फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असून, शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात चांगलीच वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तजवीज करताना अडचणी येत आहेत. उत्पादनापेक्षा फवारणीचा खर्च वाढल्याने शेती करायची कशी, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसाने आधीच खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. शेतकयांच्या हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले होते. मात्र, तरीही चांगल्या पावसामुळे शेतकर्यांमध्ये रब्बी हंगामातील पिके घेण्याचा उत्साह होता. पण ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकर्यांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळणार का? अशी भीती शेतकयांना लागून राहिली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

आमदार सुहास कांदेंच्या माध्यमातून वाचनालयाच्या सांस्कृतिक वास्तूचे नूतनीकरण होणार ➖फरहानखान मनमाड...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत वरिष्ठ महिलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार...

read more
चैत्र मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम 🚩

चैत्र मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम 🚩

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती कुलकर्णी यांना आमदार सुहास अण्णा कांदे,नगराध्यक्ष योगेशभाऊ पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी तसेच सर्व नगरसेवक यांचे उपस्थितीत शासनाकडून प्राप्त र. रु. ५० लक्ष चा धनादेश वितरित करण्यात आला.

मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती...

read more
मजुराची आत्महत्या

मजुराची आत्महत्या

नांदगांव :सुमितकुमार जगधने येथील रेल्वे मालधक्क्यावर मजुरीचे काम करून घरी जात असल्याचे सांगून...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्य़ातील अंडर 16...

read more
.