मुंबई : आज राज्य शासनाने 15 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाइकनवरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबरोबरच विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फुलारी यांनी यापूर्वी नाशिक पोलीस आयुक्तलयात उपायुक्त म्हणून काम केले असून शिंदे यांनीही पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.
नाईकनवरे व बी. जी. शेखर यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्र काढण्यात येणार असल्याचे कळते.