loader image
[ays_poll id=7]

मंत्रीमंडळ विस्ताराला आता जानेवारीत मुहूर्त?

Dec 17, 2022


राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या सरकारच्या दुस-या मंत्रिमंडळ विस्ताराला सातत्याने तारीख पे तारीखच मिळत असल्याचे पाहायला मिळत असून सूत्रांकडून आलेल्या माहिती नुसार महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त मिळाला आहे.

राज्याचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर जानेवारी महिन्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी या मंत्र्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून अमित शहा यांनी मंत्रिमंडळ विस्तारास हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन वर्षात जानेवारी अखेरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. परंतु नव्या मंत्रिमंडळ विस्तारात किती मंत्र्यांना स्थान देणार याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. तसेच भाजप आणि शिंदे गटाच्या वाट्याला किती आणि कोणते मंत्रिपदे येणार याचीही माहिती देण्यात आलेली नाही.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.