loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे बिलावल भुट्टो चा निषेध

Dec 17, 2022


मनमाड शहर भाजपा व बाळासाहेबची शिवसेना (शिंदे गट ) यांचे संयुक्त विद्यमाने पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत पाकिस्तानी विदेशमंत्री बिलावल भूत्तो यांच्या प्रतिमेचे दहन केले. मनमाड शहरात एकात्मता चौक येथे पाकिस्तान चे परराष्ट्रमंत्री बिलावल भूत्तो झरदारी यांनी आपले भारत देशाबद्दल विरोधी वक्तव्य करीत व हिंदुस्थान चे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह निंदनीय विधान केल्याबद्दल मनमाड शहर भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट ) यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा माथाडी सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार, शिवसेना नेते राजाभाऊ भाबड, शिवसेना मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे, महावीर ललवाणी,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी,भाजपा व्यापारी प्रकोष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी सरचिटणीस सचिन लुनावत, आर्थिक सेल जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत, जेष्ठ जिल्हा कार्य सदस्य उमाकांत राय, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ स्वातीताई मुळे, भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ सोनीताई पवार,मनमाड शहर सरचिटणीस नितीन परदेशी, एकनाथ बोडखे यांचे नेतृत्वा मध्ये झालेल्या या पाकिस्तान विरोधी आंदोलन मध्ये उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पाकिस्तान व पाकिस्तान चे विदेश मंत्री बिलावल भूत्तो यांचे विरोधात जोरदार घोषणाबाजो केली यात पाकिस्तान मुर्दाबाद, बिलावल भूत्तो मुर्दाबाद, देश का अपमान नही सहेगा हिंदुस्थान, भारत माता की जय, वंदेमातरम, नरेंद्र मोदी तुम आगे बढो देश तुम्हारे साथ है! अश्या देशभक्ती च्या घोषणांनी परिसर दुमदूमला. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भूत्तो यांचे प्रतिमेला चप्पले जोडे मारत त्या प्रतिमेचे सार्वजनिक रित्या दहन करण्यात आले या आंदोलन प्रसंगी भाजपा जेष्ठ कार्यकर्ते नीलकंठ त्रिभुवन, केशवराव पाटोळे, भाजपा भटके विमुक्त सेल चे जिल्हा सरचिटणीस अकबर शहा, भाजपा ओबीसी आघाडी चे जिल्हा चिटणीस गौरव ढोले, भाजपा दिव्यांग आघाडी चे जिल्हा सरचिटणीस बुऱ्हाण शेख दिव्यांग आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पगारे, भाजपा शहर उपाध्यक्ष बुधन बाबा शेख, नारायण जगताप,संजय चोपडा,मकरंद कुलकर्णी, केतन देवरे सुभाष माळवतकर, सुमेर मिसर, असिफ शेख,राजाभाऊ भाबड,आनंद काकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे अनंता भामरे राजेश घुगे, तौसिफ़ तांबोळी,मयूर माळी, कमलेश कलापुरे,ललित रसाळ किरण उगलमुगले गोविंद सानप,सचिन छाजेड,धीरज भाबड,मुकुंद झाल्टे,जीवन जगताप, ऍड राजेंद्र पालवे,दिपक साळुंखे,दिनेश घुगे, अमजद शेख , मिलिंद पाथरकर,किशोर गोसावी विलास पगारे पदाधिकारी,लोकप्रतिनिधि,कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित मोठया संख्येने उपस्थित होते आंदोलन चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जलील अन्सारी, नितीन परदेशी यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.