loader image
[ays_poll id=7]

बिबट्याने केली वासराची शिकार

Dec 18, 2022

गोरक्षनाथ लाड
दरेगाव – गेल्या काही दिवसापासून चांदवड – देवळा तालुक्याच्या दोन्ही हद्दीत बिबट्यांने जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना वाढत आहेत.ही घटना दरेगाव शिवारात वाघाड वस्तीलगत गिरणारे शिवारात माळावर गुरूवार दि.१५ रोजी पहाटेच्या सुमारास घडली.या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरेगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी भगवान बाबुराव सोनवणे यांची गिरणारे शिवारात शेती असून ते शेतात राहतात व शेतातच घराजवळ वासरू व जनावरे बांधलेली होती. गुरूवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भगवान यांचे भाऊ उठले असता पहाटेच्या सुमारास बिबट्या हल्ला करून वासराचा फडशा पाडत असल्याचे निदर्शनात आले. याबाबत सोनवणे यांनी गुरूवारी सकाळी गिरणारे येथील पोलिस पाटिल अनिल वाघ यांना कळविले.पोलिस पाटिल यांनी देवळाचे वन विभागाला भ्रमणध्वनी करून कळविले असता तातडीने वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पहाणी केली.यावेळी पायाचे ठसे तपासले असता बिबट्याने वासराची शिकार केली आहे . नुकसानग्रस्त शेतकर्यास वन विभागाने आर्थिक मदत द्यावी.वाघाच्या भितीने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकऱी व मजूर यांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.