loader image
[ays_poll id=7]

मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ट्रॅफिक बॅरिगेट्स हस्तांतर सोहळा संप्पन्न

Dec 19, 2022

नाशिक प्रतिनिधी : मेडिकव्हर हॉस्पिटल हा जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आरोग्यसेवा देणारा समूह आहे आणि १२ देशांमध्ये आरोग्य सेवा प्रदान करत आहे. जर्मनी, स्वीडन, पोलंड, तुर्की, बेलारूस, बल्गेरिया, जॉर्जिया, हंगेरी, रोमानिया, सर्बिया, मोल्दोव्हा, युक्रेन आणि भारत. अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल हे भारतातील आघाडीचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल समूहाचा भाग आहे. मेडिकव्हर रुग्णालये तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात पसरलेली आहेत आणि दरवर्षी लाखो रुग्णांवर या रुग्णालयातून उपचार करण्यात येतात. भारतातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यावर आमचे विशेष लक्ष आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व अनुभवी डॉक्टरांचा सहभाग आमच्या समूहात आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय माहितीच्या आधारावर व प्रोटोकॉल नुसार आम्ही कार्य करत आहोत.
आरोग्यसेवा करत असताना सामाजिक जाणीव ठेऊन मेडिकव्हर समूह समाजातील घटकासाठी नेहमी आपले दायित्व जपत आले आहे,याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक विभागासाठी नाशिक जिल्ह्यातील रहदारी सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या वतीने ट्रॅफिक बॅरिगेट्स हस्तांतरित सोहळ्याचे आयोजन दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४ :०० वाजता अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे करण्यात आले होते . हा सोहळा माननीय श्री शहाजी उमप ( पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला , या प्रसंगी उपस्थित समूहास संबोधित करताना म्हणाले कि, ट्रॅफिक बॅरिगेट्स मुळे नाशिक जिल्यातील वाहतुकीचे नियोजन करत असताना, वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास निश्चितच मदत होणार आहे. या हस्तांतर सोहळ्यास मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख ,केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे डॉक्टर , पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.