loader image
[ays_poll id=7]

आज होणार गावकारभाऱ्यांचा फैसला – १५ ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी आज

Dec 20, 2022

नांदगाव तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. तालुक्यातील पिंपरखेड ग्रामपंचायत मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह दिसून आला. या केंद्रावर ७ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. या निवडणुकीत गाव पुढ्याऱ्यांचे नशीब मतपेटीत बंद झाले. या ग्रामपंचायतीत कुणाची सत्ता येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील नागापूर, हिसवळ बुद्रुक, पिंपरखेड, मुळडंगरी, लक्ष्मीनगर, हिरेनगर, नवसारी, धोटाणे खुर्द, बोयगाव, धनेर, भार्डी, कसाबखेडा, लोढरे, तळवाडे, शास्त्रीनगर या १५ ग्रामपंचायतीसाठी मतदान शांततेत झाले. यात यापूर्वी नवसारी, शास्त्रीनगर, कसाबखेडा या तीन या ग्रामपंचायतील थेट सरपंच बिनविरोध निवड झाली आहे. १२ ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदासाठी ३३ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उमेदवार १७५ रिंगणात असून, एकूणच सर्व मातब्बर उमेदवारांनी प्रचारात पूर्ण शक्ती पणाला लावलेली होती.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा देखील सज्ज होती. यात ४० मतदान केंद्रांवर पोलिस निरीक्षक- १, सहाय्यक पोलिस निरीक्षक-२, पोलिस उपनिरीक्षक- २, पोलिस कर्मचारी- ३९, गृहरक्षक दलाचे ५५ जवान तैनात होते.

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
.