दरेगाव (प्रतिनिधी-गोरक्षनाथ लाड)चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृतीदिन विविध कार्यक्रम आयोजित करुन उत्साहात संपन्न झाला.
या निमित्ताने स्वच्छता दूत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक श्री.रविराज पाटील यांचे हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले.मुख्याध्यापक श्री.जनार्दन देवरे यांनी जीवनकार्याबद्दल माहिती दिली.’गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला..!’हे भजनही विद्यार्थ्यांनी सादर केले.शिक्षिका श्रीमती शोभना बिरारी , वाल्याबाई देवरे, सरला अहिरे व वैशाली पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तर साहेबराव देवरे यांनी आभार मानले.श्री.दीपककुमार निकम व रमेश राऊत यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.श्री.बाळासाहेब सावंत यांनी सूत्रसंचलन केले.यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीराम जन्मोत्सव निमित्त मनमाडला बुधवारी बैठकीचे आयोजन
मनमाड- सालाबादप्रमाणे 1986 पासून सलग 40 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...











