loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड येथील बेथेल चर्चच्या माध्यमातून आमदार संपर्क कार्यालयात कॅरल सिंगिंग उपक्रम संपन्न

Dec 22, 2022


मनमाड शहरामध्ये ख्रिस्ती समाजाची मोठी संख्या आहे, ख्रिस्ती समाज बांधव सध्या नाताळ सप्ताह साजरा करत आहे, आमदार सुहास अण्णा कांदे यांनी देखील नाताळ सणा निमित्त मोठा कार्यक्रम मनमाड शहरात घेतला व त्या माध्यमातून ख्रिस्ती बांधवांना नाताळ भेटही दिली ख्रिस्ती समाजातील विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या बांधवांना सन्मानितही केले आहे.

नाताळनिमित्त मनमाड शहरातील विविध चर्चमध्ये रोजच उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून काल बुधवार रोजी बेथेल चर्चचे पाळक दीपक साबळे व त्यांच्या टीमने आमदार सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालयात कॅरोल सिंगिंग चा कार्यक्रम घेतला. याप्रसंगी उपस्थित टीमने कॅरोल सिंगिंग च्या माध्यमातून नाताळच्या विविध भक्ती गीतांनी वातावरण आनंदमय झाले होते. पाळक दीपक साबळे यांनी यावेळी प्रार्थना केली, आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून साकार होत असलेली हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजना कोणताही अडथळा न येता पूर्ण व्हावी, व मनमाड करांना नियमित पाणी मिळावे म्हणून प्रभू येशू कडे प्रार्थना केली. त्यावेळी बेथेल चर्चा पाळक दीपक साबळे यांचे मनमाड शहर कोर कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी या सर्व टीमचे स्वागत केले.
शिवसेना ज्येष्ठ नेते राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ हांडगे, वैद्यकीय मदत कक्षा तालुका समन्वयक पिंटूभाऊ वाघ, युवासेना शहरप्रमुख आसिफभाई शेख, सुभाषभाऊ माळवतकर, शिवसेना ज्येष्ठ नेते लालाभाऊ नागरे, लोकेश भाऊ साबळे, महेश बोराडे, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर, निलेश व्यवहारे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.