loader image
[ays_poll id=7]

पुन्हा कोरोनाचा धोखा :आरोग्य यंत्रणांनी अलर्ट राहावे – पंतप्रधान मोदींच्या सूचना

Dec 22, 2022

मास्कसह कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे. तसेच येणारे सण आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी राज्यांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यांमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

सर्व राज्यांच्या आरोग्य यंत्रणा अलर्टवर ठेवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत दिल्या. लसीकरणासह सतर्क रहाणे महत्त्वाचे असल्याचे सांगत पंतप्रधानांनी देशवासियांना सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन केले. तसेच कोरोना नियमांसंदर्भात जनतेत पुन्हा जागरुकता आणावी अशा सूचना त्यांनी राज्यांना दिल्या.
बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीत कुठल्याही सक्तीच्या नियमांची घोषणा करण्यात आली नाही. पण जिनोम सिक्वेंसिग आणि कोरोना टेस्ट वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य व्यवस्थेचे ऑडिट करत रुग्णालयं सज्ज ठेवावीत अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधींच्या लसीकरणावर भर द्या असंही ते म्हणाले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणीही मास्कचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं.

आजच्या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. देशात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येची वाढ कमी असली तरीही जगभरात मात्र ही संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात टास्क फोर्सचे पुनर्गठन
आज नागपुरात राज्य सरकारने या संबंधित महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत कोरोना संदर्भातील टास्क फोर्स पुनर्गठीत करण्याचा निर्णय झाला. राज्यातील तज्ञ डॉक्टर आणि अधिकारी या टास्क फोर्समध्ये असतील. त्यामुळे कोरोना परिस्थितीवर केंद्र आणि राज्य सरकार बारीक लक्ष ठेवून आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.