loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा.

Dec 22, 2022


मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी
यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन क्रीडा महोत्सवास प्रारंभ
करण्यात आला.व संस्थेतर्फे
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कुलसूम गाजियानी पार्क नावाने तयार केलेले खेळणी उद्यानाचे (पार्क) शुभारंभ करण्यात आले.संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजीयानी, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर
यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या खेळाडु विद्यार्थ्यांकडुन क्रीडा ज्योत दौड करुन शालेय क्रीडा महोत्सवाची
सुरुवात मोठया उत्साहात करण्यात आली. यावेळी संस्थेच्या सचिव हज्जन सायराबानो सलीम
गाजीयानी, सदस्य अब्दुल करीम सलीम गाजीयानी,आदिलभाई गाजियानी,सादीकभाई पठाण, मनमाड शहराचे मा. नगराध्यक्ष श्री. गणेशभाऊ धात्रक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम
अहमद गाजीयानी यांनी उपस्थित सर्व सहभागी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले व स्पर्धेसाठी शुभेच्छा
दिल्या. संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम, मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर शब्बीर अहमद, शेख आरीफ कासम यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, संगित खुर्ची, बॉल रेस, आटा गोली, रिंग रेस,
लिंबु चमचा, थैला रेस, लंगडी, खो-खो, डॉच बॉल, बलुन रेस, रस्सा खेच असे विविध खेळांच्या स्पर्धा
घेण्यात आल्या व विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात सहभाग घेतला. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी
रस्साखेच, संगित खुर्ची व बलुन रेस स्पर्धा घेण्यात आली.

संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजीयानी, मुख्याध्यापक
भुषण शेवाळे सर, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम व शिक्षकांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र
व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजीयानी यांनी यशस्वी नियोजन केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.