loader image
[ays_poll id=7]

लष्कराचा ट्रक दरीत कोसळून सिक्कीम मध्ये १६ जवान ठार

Dec 23, 2022

उत्तर सिक्कीममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या भागात लष्कराच्या ट्रकचा अपघात झाला असून यामध्ये 16 जवानांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चार जवानही जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, 23 डिसेंबर 2022 रोजी उत्तर सिक्कीममधील जेमा येथे लष्कराच्या ट्रकला अपघात झाला. या भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या 16 जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे.
लष्कराने सांगितले की, अपघातग्रस्त वाहन तीन वाहनांच्या ताफ्यातील एक होते. जे सकाळी चतनहून थंगूच्या दिशेने निघाले होते. जेमाकडे जाताना एका तीव्र वळणावर वाहन घसरले आणि खाली दरीत कोसळले. अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली आणि चार जखमी जवानांना विमानाने उपचारासाठी हलवण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
.