loader image
[ays_poll id=7]

जे टी हायस्कूल मध्ये ख्रिसमस साजरा

Dec 24, 2022


जिंगल बेल…. जिंगल बेल….. ऑल द वे ……ची धून गात नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी ख्रिसमस उत्साहात साजरा केला. या निमित्ताने विद्यालयातील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सांताक्लॉजचा पेहरावकरून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुलांमध्ये जाऊन त्यांनी चॉकलेट वाटले. मुलांनी सांताक्लॉज बरोबर जिंगल बेल गाण्याच्या तालावर नृत्य सादर केले.मुलांनी सामूहिक ख्रिसमस गीत गात व नृत्याच्या तालावर नाचत आपला उत्साह द्विगुणीत केला. तसेच शाळेतील शिक्षिका सरोज त्रिभुवन यांनी ख्रिसमस सणाविषयी विद्यार्थ्यांना छान माहिती दिली व सुंदर असे प्रार्थना गीत सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी ख्रिसमस निमित्ताने विविध नाटिका सादर केल्या. कार्यक्रमाच्या अखेरीस केक कटिंग करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टेला फर्नांडिस तर प्रस्तावना शैलेंद्र दामले यांनी केली.कविता चौधरी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन प्राचार्य मनी चावला यांच्या अध्यक्षतेखाली शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सचिव विजय चोपडा, सरचिटणीस प्रमिलाताई कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदिवाल प्रशासकीय प्रमुख प्रकाश गुप्ता, स्कूलचे प्राचार्य मनी चावला, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.