loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात नाताळ सण साजरा

Dec 26, 2022


मनमाड : ( योगेश म्हस्के) नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे. ईसाई बांधव या सणाला मोठया उत्साहाने साजरा करतात. ख्रिस्ती बांधवांचा हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला सर्वत्र साजरा होतो. या दिवशी प्रभु ईसा मसीह यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते.

येशु ख्रिस्त एक महान व्यक्ति होते त्यांनी समाजाला प्रेमाची आणि मानवतेची शिकवण दिली. येशुख्रिस्तांनी जगभरातील जनतेला प्रेमाने आणि सद्भावनेने राहण्याचा संदेश दिला. येशुंना देवाची एकमेव संतान मानले जाते. त्याकाळातील शासन कर्त्यांना येशुख्रिस्तांचा हा संदेश पसंत पडला नाही त्यामुळे त्यांनी येशु ख्रिस्तांना सुळावर लटकवले आणि मारून टाकले. त्यानंतर येशु ख्रिस्त पुन्हा जिवंत झाल्याचे ख्रिश्चन बांधव मानतात.
नाताळ च्या सणाला ख्रिस्ती बांधव आपल्या घराला अतिशय सुरेख पध्दतीने सजवितात.नाताळच्या दिवशी चर्च मधे विशेष प्रार्थना होते. माणसं आपल्या नातेवाईंकांना आणि मित्रमंडळींना भेटण्याकरता एकमेकांकडे जातात, भेटवस्तुचे आदानप्रदान होते.
ख्रिसमसच्या दिवशी आपल्या अंगणात ख्रिसमस ट्रि लावल्या जातात त्याला देखणं रूप दिलं जातं. घरावर रोषणाई केली जाते.

मनमाड शहरात देखील ख्रिस्ती बांधवांकडून आज नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील संत बार्णबा चर्च , संत फ्रांन्सिस झेवियर्स चर्च , बेथेल चर्च आणि शहरातील इतर चर्च मध्ये देखील नाताळ निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील ख्रिस्ती बांधवांनी चर्च मध्ये जाऊन विशेष प्रार्थना करून एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या , यावेळी लहान मुलांना भेटवस्तु देखील देण्यात आल्या. चर्च परिसरामध्ये प्रभु येशु यांचा जन्माचा सुंदर देखावा देखील सादर करण्यात आला.


अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.