loader image

कोविड १९ व्हेरीएंट बीएफ ७ विषाणुशी लढण्यास सरकार सक्षम – ना. भारती ताई पवार

Dec 26, 2022


कोविड १९ चा व्हेरिएंट बीएफ ७ या नवीन विषाणूमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकार सक्षम आहे, असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी पुद्दुचेरी येथे केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम पवार यांनी पद्दुचेरीतल्या हॉटेलमध्ये नागरिकांबरोबर ऐकला. त्यानंतर त्या बोलत होत्या.
पवार यांनी पुढे सांगितले की, बीएफ ७ विषाणूचा जपान, चीन आणि काही अन्य देशांमध्ये झपाट्याने प्रसार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी बैठक घेत परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिल्याचेही पवार यांनी सांगितले.
आतापर्यंत देशात बीएफ ७ विषाणूचे चार रुग्ण आढळल्याचे पवार यांनी सांगितले. देशात लसीकरण मोहीम अधिक व्यापकपणे राबवली जाणार आहे. तसेच कोणतीही आणिबाणीची स्थिती हाताळण्यासाठी आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल,असेही त्यांनी सांगितले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.