loader image
[ays_poll id=7]

बिलिंगच्या बाबतीत चांगल्या कामाबद्दल मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महावितरणचे अभिनंदन

Dec 27, 2022

महावितरणच्या वीज देयकांच्या अर्थात बिलिंगच्या बाबतीत आर्थिक वर्ष २०२० -२१ मध्ये १०.२२ लाख तक्रारी आल्या होत्या व ती संख्या डिसेंबर २०२२ पर्यंत २.७२ लाख इतकी कमी झाली आहे. बिलिंगमध्ये गुणात्मक सुधारणा दिसत असून अतिशय चांगले काम केल्याबद्दल आपण महावितरणचे अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपूर येथे विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या दरम्यान सांगितले.

पनवेल तालुक्यातील महावितरण कंपनीकडून ग्राहकांना दिल्या गेलेल्या वीज देयकांच्या संदर्भात सन्माननीय सदस्य प्रशांत ठाकूर व इतर सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मा.उपमुख्यमंत्री बोलत होते.

मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बिल देण्यासाठी मीटरचा फोटो काढला जातो. अचूक देयक देण्यासाठी मीटर वाचन अचूक होणे गरजेचे आहे. मीटरचे फोटो तपासणी करताना संपूर्ण राज्यात अस्पष्ट फोटोंचे प्रमाण जानेवारी २०२२ मध्ये ४५.६ टक्के होते. ते प्रमाण नोव्हेंबर २०२२ मध्ये १.९ टक्के इतके कमी झाले आहे. आर्थिक वर्ष २०२० -२१ मध्ये बिलिंग तक्रारी १० लाख २२ हजार इतक्या आल्या. त्यांची संख्या आर्थिक वर्ष २०२१ -२२ मध्ये ४ लाख ५८ हजार झाली. पंधरा डिसेंबर २०२२ पर्यंत बिलिंग तक्रारींची संख्या २ लाख ७२ हजारपर्यंत कमी झाली आहे. फेब्रुवारी २०२२ पासून ज्या मीटर रीडिंग एजन्सीच्या कार्याचा अहवाल असमाधानकारक होता अशा ७६ एजन्सींना बडतर्फ करण्यात आले तर तीन एजन्सींना काळ्या यादीत टाकण्यात आले. राज्यात सरासरी देयकांचे प्रमाणही कमी झाले आहे.

त्यांनी सांगितले की, पनवेल तालुक्यात मीटरच्या फोटो पडताळणीमध्ये फेब्रुवारी २०२२ मध्ये अस्पष्ट फोटोंचे प्रमाण १२ टक्के होते ते नोव्हेंबरअखेर १.३ टक्के इतके कमी झाले. या तालुक्यात सरासरी देयकांचे प्रमाणही जुलै महिन्यातील ७.३ टक्क्यांवरून घसरून नोव्हेंबरमध्ये ५.७ टक्के इतके कमी झाले आहे. चुकीच्या मीटरवाचन आणि इतर त्रुटींबाबत या विभागात काम करणाऱ्या कंत्राटदारांना चालू आर्थिक वर्षात ६ लाख ५९ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.