loader image
[ays_poll id=7]

विज्ञान हे सत्याच्या तथ्यावर आधारीत असते-ठकसेन गोराणे

Dec 30, 2022


नांदगांव :(प्रतिनिधी) आपला देश जर खऱ्या अर्थाने महाशक्ती व्हायचा असेल तर तो अंधश्रद्धा मुक्ती असावा लागेल. वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा समाजच प्रगतीशील समाज असु शकतो. विज्ञान हे सत्याच्या तथ्यावर आधारीत आहे. असे अंनिस चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे म्हणाले. ते येथील
मविप्रच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात व न्यु . इंग्लिश स्कूल येथे अंनिसच्या वतीने आयोजित केलेल्या “वैज्ञानिक दृष्टिकोन चमत्कार सत्यशोधन प्रात्यक्षिक ” सप्रयोग व्याख्यानात बोलत होते. यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य एन. बी. शिंदे ,प्रा देवरे,प्रा पवार,मारूती जगधने, प्रा सुरेश नारायणे,वामन पोतदार,भगिरथ जेजुरकर, आदी उपस्थित होते., आपन व्हाँटशाँप इनव्हॆरसिटीवर काम करतो यातुन पसरणाऱ्या अंधश्रध्दांना आळा बसण्यासाठी आपण अंधश्रध्दा निर्मुलनच्या माध्यमातून स्वागत करुन होणाऱ्या परिणामाला ब्रेक लावु या असे अध्यक्षिय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन.शिंदे म्हणाले. यावेळी डाॅ गोराणे यांनी पाण्यावर दिवा पेटविणे, डोळे बंद करुन वस्तू ओळखणे, अग्नी पेटविणे, या सारखी अनेक सप्रयोग विद्यार्थ्यांसमोर सादर करुन विज्ञानाच्या कसोटीला उतरुया व होणाऱ्या परिणामाची चित्कीसा करु या तसेच होणाऱ्या चमत्कारामागील कार्य कारणभाव तपासून बघू या
असे डाॅ .गोराने यांनी विविध सप्रयोगाद्वारे स्पष्ट केले दरम्यान न्यु. इंग्लिश स्कुलवरील कार्यक्रामात शेकडो विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करुन त्यामागील विज्ञानाच्या कार्यकारणभावाचे स्पष्टीकरण केले. या प्रसंगी मुख्याध्यापक डी. व्ही. गोटे, उपमुख्याध्यापिका काळे मॅडम, पर्यवेक्षक तुकाराम घुगे सर, विज्ञान शिक्षक अविनाश शेवाळे,
प्रकाश फणसे, व न्यु.इंग्लिश स्कुलचे सर्व शिक्षक,शिक्षीका,तसेच सेवकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महाविद्यालयात प्राचार्यडॉ.एस.एन.शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्य प्रा.आर.टी.देवरे,प्रा.बी.के.पवार, प्रा.बच्छाव,प्रा.आर.एल.दिवटे, प्रा.गढरी,प्रा.श्रीमती. झेड.बी.अन्सारी,प्रा.श्रीमती.शेवरे, व अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविद्यालयातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.के. पवार यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
.