loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुका आजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Dec 31, 2022


मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.रेणुका आजी हिरे यांच्या ११५ वी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ अरुण पाटील यांनी स्व. रेणुका आजींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. बहुजन समाजासाठी असंख्य शिक्षण संस्था काढून त्यांना अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाश दाखविणाऱ्या, कित्येक पिढ्या ज्यांच्या खंबीर साथीने साक्षर करू शकले अशा कर्मवीरांना जीवाचे रान करून, कष्ट, घाम गाळून स्वर्गीय रेणुका आजींनी साथ दिली. आर्थिक आधार देऊन शिकण्याची उमेद दिली, जगण्याचे बळ दिले, संकटात टिकून राहण्याचे ध्येय दिले न कळत्या वयात संसाराची जबाबदारी अंगावर पडलेल्या रेणुका आजींना शिक्षण घेता आले नाही अनुभवाच्या शाळेने जगण्याचे तत्वज्ञान शिकविले जीवनाच्या पुस्तकाने शहाणपणाचे समंजसपणाचे धडे दिले. संसारातल्या कठीणतल्या कठीण प्रश्नांनी, प्रसंगांनी, संसारी सुख समाधान दिले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. गणेश गांगुर्डे यांनी रेणुका आजी हिरे यांच्या कार्याविषयी विषयी विस्तीर्ण शब्दात माहिती सांगितली. महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा समितीचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना स्व. रेणुका आजी हिरे यांनी मोलाची साथ दिली. महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ पी. जे. आंबेकर यांनी रेणुका आजी हिरे यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे, पर्यवेक्षक विठ्ठल फंड कुलसचिव समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
.