Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चार नवीन राष्ट्रीय विक्रमासह आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ला तीन सुवर्णपदक

Dec 31, 2022

नागरकोईल तामिळनाडू येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युथ, ज्युनिअर व सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या मुकुंद संतोष आहेर याने ऐतिहासिक कामगीरी करीत राष्ट्रीय सिनियर व ज्युनियर गटाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत ज्युनियर मध्ये तीन व सिनिअर मध्ये मध्ये एक असे एकूण चार नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत तीन सुवर्णपदके पटकवीत ऐतिहासिक कामगिरी केली असून चार राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर करणारा मुकुंद महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू ठरला आहे
55 किलो वजनी गटात सहभागी होत मुकुंद ने मध्ये स्नॅच मध्ये 114 किलो वजन उचलून ज्युनिअर व सिनियर या दोन्हीही वयोगटात दोन नवीन राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केले स्नॅच मध्ये नवीन राष्ट्रीय विक्रमी कामगिरी करताना ज्युनियर मध्ये 108 किलो चा व सिनियर मध्ये 113 किलो चा विक्रम 114 किलो वजन उचलून मोडीत काढत चुरशीच्या स्पर्धेत विक्रमी कामगिरी बजावली क्लिन जर्क मध्ये सुद्धा ज्युनिअर चा 139 किलो चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढीत 140 किलो वजन उचलून ज्युनिअर मध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला 244 किलोचा एकूण वजन उचलण्याचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत 254 किलो वजन उचलत ज्युनिअर गटामध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केला चार नवीन राष्ट्रीय विक्रमांसह ज्युनिअर सिनियर व आंतरराज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावली
40 किलो मुलींच्या युथ वजनी गटात मुकुंद ची लहान बहीण वीणाताई संतोष आहेर हिने चुरशीच्या लढतीत आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत स्नॅच मध्ये 57 किलो व क्लिन जर्क मध्ये 66 किलो असे एकूण 123 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले
आंतरराष्ट्रीय खेळाडू व 40 किलो युथ वजनी गटातील राष्ट्रीय विक्रम नावावर असणारी आकांक्षा किशोर व्यवहारे हिने राष्ट्रीय स्पर्धेत 45 किलो वजनी गटात पहिल्यांदा च सहभागी होत चुरशीच्या लढतीत 65 किलो स्नॅच व 79 किलो क्लिन जर्क असे 144 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले
45 किलो ज्युनिअर गटामध्ये मेघा संतोष आहेर हिने आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत 56 किलो स्नॅच व 79 किलो क्लिन जर्क असे एकूण 135 किलो वजन उचलून पाचवा क्रमांक मिळविला. लागोपाठ दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड चे प्राचार्य डॉ अरुण पाटील,क्रीडा संचालक प्रा संतोष जाधव छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक देशपांडे संदीप,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस के आर टी विद्यालयाचे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे श्री गुरू गोविंद सिंग हायस्कुलचे प्राचार्य सदाशिव सुतार यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित...

read more
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

  मनमाड:- भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक आयोजित नमो चषक 2024 टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

  विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि...

read more
भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

मनमाड - भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते चे प्रमुख प्रेरणा स्थान माजी...

read more
चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारातमती दौऱ्यावर असून तेथे त्यांनी शासकीय धोरणांवरही...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]