मनमाड मध्ये गेली २६ वर्ष सातत्याने सुरू असलेल्या विवेकानंद व्याख्यानमालेच्या यंदाच्या वर्षी एक अभिनव उपक्रम होणार आहे.
०९/०१/२३ रोजी होणारा सामुदायिक भारतमाता पूजन हा यंदाचे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आगळा वेगळा कार्यक्रम कदाचित भारतातील पहिला कार्यक्रम असावा केवळ मनमाडच नव्हे तर अन्य ठिकाणची मंडळी ही सहभागी होऊ शकतात.
कार्यक्रमासाठी ₹ ११११/- शुल्क असल्याने कृपया आधी नोंदणी करावी ही विनंती
भारतमाता पुजनातून एक प्रकारची कौटुंबिक जवळीक,जिव्हाळा व त्यातून एकात्मिक वातावरण निर्मिती हा उद्देश सफल व्हावा याहेतूने नैमित्तिक पूजा आणि मनमोकळ्या गप्पासहित सहभोजन असा कार्यक्रम असेल सर्व मनमाड कर बंधू भगिनींनी या पूजन सोहळ्यात सहभागी व्हावे हे आग्रहाचे आवाहन समिती करीत आहे.
दिनांक १० ते १२ जानेवारी हे तीन दिवस चालणारी सातत्यपूर्ण अशी ही विवेकानंद व्याख्यानमाला यंदा सत्ताविसाव्या वर्षाचं आपला ज्ञानदान यशस्वी करणार आहे.
सन्माननीय शरदजी पोंक्षे (ज्येष्ठ अभिनेते),डॉ हेमंतजी ओस्तवाल (संचालक सुयश हॉस्पिटल नाशिक)आणि डॉ नरेंद्रजी जाधव साहेब ज्येष्ठ शिक्षणतज्ञ,अर्थतज्ञ, सामाजिक विषय तज्ञ आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी फंडाचे सदस्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशा अनेकविध जबाबदाऱ्या सांभाळणारे माजी राज्यसभा सदस्य अशी त्यांची ओळख आहे.
अशा तीन मान्यवर वक्त्यांसह फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट केंद्र सरकारच्या अनेक विभागांनी दखल घ्यावी असे कार्य करणारे आपल्या मालेगांव मधील एक सामान्य कार्यकर्ते ज्यांची केंद्र सरकारतर्फे पावर ग्रीड कॉर्पोरेशनच्या संचालक पदी नियुक्ती करून जनतेचे सरकार ही अनुभूती मिळवून दिली असे चेतन कांकरिया यांची ओळख देखील आपण करून घेणार आहोत.


अर्थात हे सर्व करण्यासाठी आपल्याला आपले कार्य सम्राट आमदार साहेब मा श्री सुहास कांदे,प्रगती बँक,अमृत परिवार, राकेशजी ललवाणी, कैलाशजी बेदमुथा,शिवम कंप्युटरचे श्री व सौ प्रकाशजी भुजबळ यांच्यासह अनेकांचे सहकार्य या कार्याला लाभते हीच या कार्याची प्रेरणा आहे असा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण सहभागी होऊन आमचा आनंद द्विगुणित कराल यात शंका नाही असे भावनिक आवाहन संस्कृती संवर्धन समिती मनमाड यांच्या वतीने करण्यात आले आहे
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष प्रवीण व्यवहारे ,समिती अध्यक्ष प्रमोद मुळे यांच्यासह सर्व कार्यकारिणी व हा अभिनव उपक्रम राबवण्यासाठी प्रकल्प प्रमुख सतिष न्हायदे,सह प्रमुख सिद्धांत लोढा हे विशेष प्रयत्न करीत आहेत
भारतमाता पूजनासाठी सहभागी होऊ इच्छितात अशा सर्वांना विनंती आहे की त्यांनी कृपया सतिष न्हायदे,रत्नाकर घोंगडे, डॉ सुहास जाधव,प्रसाद दिंडोरकर,महेश नावरकर वा समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून आपली जागा निश्चित करावी.












