loader image

आंबेडकरी चळवळीला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांन सारख्या निष्ठावंतांची गरज : प्रकाश वाघ

Dec 31, 2022


येवला (प्रतिनिधी)
भारतीय लोकजीवन सातत्याने धर्म-जात,पंथ,प्रांत यात विभागून विषमतेचे विष लोकांमध्ये पेरण्याचे काम देशात होत असून लोकशाही, समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुता,धर्मनिरपेक्षता,राष्ट्रीय एकता-
एकात्मता,वैज्ञानिक दृष्टिकोन हा भारतीय संविधानिक मूल्य विचार विषमतावादी राज्यकर्ते गाडू पहात आहेत. मन,मनगट,मेंदूने सशक्त भारतीय समाज घडविणे व बहुजन हिताय बहुजन सुखाय तत्व अंगिकारून निस्वार्थ वृत्तीने स्वतःला झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीला आवश्यक असून कर्मवीर दादासाहेब गायकवाडांसारख्या निष्ठावंतांची राष्ट्राला गरज असल्याचे प्रतिपादन येवला पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाशभाऊ वाघ यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येवला संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येवला यांच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक सुधारणा चळवळीचा बिनीचा शिलेदार,निष्ठावंत अनुयायी,कार्यकर्ता,स्पष्ट,निर्भीड,हरहुन्नरी कार्यकर्ता,चारित्र्य-शिलसंपन्न,विश्वासू सखा म्हणून दादासाहेब गायकवाड यांचे कार्य सदैव प्रेरक असल्याचे मत वाचनालय आभ्यासिकेचे संस्थापक प्रा.शरद शेजवळ यांनी मांडले.कसेल त्याची जमीन नसेल त्याचे काय ? असा रोख सवाल करून मनुस्मृती संसदेत फाडणार व विषमतावादी व्यवस्थेची लोकभाषेत चिरफाड करणारा व्यक्तिमत्त्व म्हणजे दादासाहेब गायकवाड होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत मी जर कधी माझे आत्मचरित्र लिहिले तर त्याचा निम्म्याहून अधिक भाग मला भाऊराव (दादासाहेब) गायकवाड यांच्याविषयी लिहावा लागेल अर्थातच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कौटुंबिक, सामाजिक,खाजगी आयुष्यात दादासाहेब गायकवाड यांचे स्थान इतके महत्वाचे होते असे शरद शेजवळ यांनी यावेळी सांगितले.
येवला मर्चंड बँकेचे संचालक सचिन गांगुर्डे,येवला बस स्थानकाचे व्यवस्थापक विकास वाहुळ,धिवर,सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोदकर,विनोद त्रिभुवन,संदीप गुंजाळ आदी मान्यवर ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शरद शेजवळ,सूत्रसंचालन राजरत्न वाहूळ यांनी केले.
साहिल जाधव,ललित भांबेरे,रोहित गरुड,कुणाल ठाकरे,निलेश महाले,ओम पठाडे,तथागत अहिरे,शुभम मोरे,अजित काळे,प्रमोद वाघ,जीवन दळे,पंकज घुले आदी ह्यावेळी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.