loader image
[ays_poll id=7]

न्यायडोंगरी परिसरात अवैध गौण खनिजाचे उत्खनन न्यायडोंगरी- ( जगन पाटील )

Jan 1, 2023


नांदगाव तालुक्यातील अनाधिकृतपणे चालू असलेल्या गौण खनिज खडी क्रशर गैरव्यवहाराबाबत गेल्या आठवड्याभरापासून प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रशासनाचे धिंडवडे निघू लागल्याने त्यावरून प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यात तू तू मैं मैं सुरू असून एकमेकाकडे अंगुली निर्देश करण्याचा प्रकार चालू असल्याचे दिसून येते तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज प्रकरण सुरू असताना तालुका प्रशासनाला त्याची कल्पना नसावी! थेट जिल्हा पातळीवरून तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वरिष्ठ अधिकारी नांदगाव तालुक्यात येऊन कारवाई होते परंतु तालुक्यातील प्रशासन याबाबत अनभिज्ञ हे एक न उलगडणारे कोडे वाटत असले तरी नुकताच प्रत्यक्षात तालुका पातळीवर सर्व गोष्टी माहिती असतानाही कारवाई होत नसल्याचे प्रकरण लेखी स्वरूपात समोर आलेले आहे. न्यायडोंगरी गावातील शासकीय जमिनीतून मोठ्या प्रमाणावर गौण खनिज मुरमाची उत्खनन करून वाहतूक होत असल्याचे प्रकरनी सर्व तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सर्व पुरव्यनिशी लेखी स्वरुपात तीन महिन्यापूर्वी कळवूनही कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही याबाबत न्यायडोंगरी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील उत्तमराव आहेर यांनी सर्व पुराव्यांशी दिनांक दिनांक ०१/०९/२०२२ रोजी तहसीलदार नांदगाव ,तलाठी न्यायडोंगरी, ग्रामविकास अधिकारी न्यायडोंगरी ,वनपरिक्षेत्र अधिकारी नांदगाव ,विभागीय वन अधिकारी (A S F) चांदवड तसेच दिनांक ०३/१०/२०२२ रोजी जिल्हा वनाधिकारी नासिक, जिल्हा अधिकारी नाशिक यांना लेखी स्वरुपात पुराव्यानिशी त्यात उत्खनन करीत असलेले जे सी बी मशीन, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर ,चालकाचे नाव ,वाहतूक करणारे अनेक ट्रॅक्टर , यांचे फोटो व ध्वनीचीत्र फित देऊनही याबाबत मात्र ती ध्वनीचित्र फित देऊनही याबाबत मात्र तीन महिन्यातही कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही याच तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी व जिल्हा वनाधिकारी यांच्याकडे सुद्धा देऊन त्याच्या पोहच घेण्यात आलेल्या असतानाही जिल्हा पातळीवरून अथवा तालुका पातळीवरून याबाबत कुठलीही चौकशी न करता उलट पक्षी तक्रारदारालाच एक प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रकार कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे त्यांनी दिलेल्या लेखी नोटीस क्रमांक/२८७/२०२२ वरून स्पष्ट होते.या नोटीसच्या अनुषंगाने मी स्वतः नांदगांव तहसिल कार्यालयात जाऊन मंडल अधिकारी यांचेकडे माझा लेखी स्वरुपात पुराव्यानिशी जबाब नोंदविला आहे.तरीही कारवाई झाल्याचे आढळून आले नाही, असे सुनिल आहेर यांनी दिलेल्या लेखी प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे. न्यायडोंगरी गावातील सावरगाव रोडच्या कडेला असलेल्या शासकीय जमिनीतून अवैध पणे मोठ्या प्रमाणात जे सी बी च्या साह्याने उत्खनन करून व ट्रॅक्टरच्या साह्याने मुरमाची वाहतूक होत असल्याचे प्रत्यक्ष चित्रण आणि फोटो संबंधित तहसीलदार सह इतर सबंधित वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवूनही तसेच स्वतः तलाठी न्यायडोंगरी यांनी डोळ्यादेखत परिस्थिती पाहून त्याचे फोटो वगैरे घेतलेले असताना मात्र याबाबतची कुठलीही चौकशी झाली नाही त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सध्या सुरू असलेली तू तू मैं मैं व आम्हास या बाबत काही माहितीच नाही म्हणजेच ” मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली “असाच प्रकार म्हणावा लागेल.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.