loader image
[ays_poll id=7]

आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा – भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन

Jan 1, 2023

मनमाड क्रिकेट समितीद्वारे आयोजीत आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा नुकत्याच मनमाड येथील महर्षी भगवान वाल्मीकी स्टेडियम येथे संपन्न झाल्या. मनमाडमधील विविध शालेय संघामध्ये सामने खेळवले गेले. या सामन्यांमध्ये भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडुंनी जोरदार प्रदर्शन करुन आपल्या शालेय संघास विजेतेपद मिळवून देण्यात महत्वपूर्ण कामगीरी केली. गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल संघाकडून खेळताना चार सामन्यांमध्ये अंशुमान सरोदे या खेळाडुने तब्बल 168 धावा केल्या ज्यात 27 चेंडूमध्ये 74 धावा ही त्याची सर्वश्रेष्ठ कामगीरी ठरली व यासाठी त्याला स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज व मॅन ऑफ द सिरिज घोषीत करण्यात आले तसेच आयुष व्यवहारे सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला. सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक स्वामी दिंडे व अंतिम व महत्वपुर्ण सामन्यातील सामनावीर अध्ययन चव्हाण हा ठरला. भुमी क्रिकेट अकॅडमीतील ह्या खेळाडुंनी हे दमदार प्रदर्शन आपल्या शालेय संघासाठी केले व विजेतेपद पटकवले.

या कामगीरिसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नायडू सर , क्रिडा शिक्षक श्री. लकी सर , श्री. मजहर शेख सर , देशपांडे सर यांच्यासमवेत शाळेच्या ईतर शिक्षक व कर्मचारी या सर्वाकडुन कौतुक केले जात आहे.

भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ श्री. ईरफानभाई मोमीन व मार्गदर्शक मा. राजाभाऊ पगारे , मा. गणेशभाऊ धात्रक , मा. संजय निकम , श्रेणिक बरडिया , हबीबभाऊ शेख , सिध्दार्थ बरडिया,परवेज भाई शेख , कौशल शर्मा ,तय्यबभाई शेख , सनी फसाटे , नितीन आहिरराव , शुभम ( बापु ) गायकवाड , मनोज ठोंबरे सर तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे यासर्वाचे अभिनंदन करुन पुढिल होणार्या सामण्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
.